मी एकत्र कुटुंबपद्धती असलेल्या घरात वाढले. सख्खी-चुलत मिळून आम्ही पाच भावंडे (दोन मुली, तीन मुले) एकत्र राहत होतो. प्रत्येकाचा स्वभाव निराळा. त्यातून भांडणे, वाद आणि खोड्या या उद्भवणारच! लहान भावंडांना आजीकडून full protection मिळायचे. त्यांनी कितीही खोड्या केल्या तरी आजी पाठीशी घालणार हे गृहीतच धरलेले असायचे. मग अश्या वेळेस निरनिराळे मार्ग शोधले जायचे कि जेणे करून आजीचा ओरडा हि खावा लागू नये आणि खोड्या काढणाऱ्या भावंडाला अद्दल देखील घडली पाहिजे.
आमचे घर म्हणजे एक लांबलचक आगगाडीचा डबाच! एका मागोमाग एक अश्या एकूण पाच खोल्या होत्या. पहिले kitchen, नंतर एकमेकाला लागून असलेल्या दोन बेडरूम्स, त्यानंतर बाथरूम कम dry बाल्कनी आणि शेवटी बेडरूम + बैठक. बाथरूम हे घराच्या अगदी मध्यात होते. घराचे छत पत्र्याचे व बऱ्यापैकी उंच असल्याने, बाथरूम मध्ये विजेच्या दिव्याशिवाय अजिबात दिसत नसे. याच गोष्टीचा फायदा घेतला जायचा. ज्या लहान भावंडाची जिरवायची आहे, तो आंघोळीला गेला कि त्याचा दादा बाहेरून दिवा बंद करत असे. त्याने कितीही आरडा-ओरडा केला तरी आवाज पटकन किचन पर्यंत किंवा बैठकी पर्यंत जायचा नाही. मग बिचाऱ्याला तशीच कशीबशी आंघोळ उरकून बाहेर यावे लागे. तोवर दादा तिथून पसार झालेला असे. मग काय? सगळेच संशयित! सगळ्या मोठ्यांना मग बोलणी खावी लागत. पण तोवर सगळ्यांनी धाकट्याची फजिती भरपूर एन्जोय केलेली असायची. हा परिपाठ बरेच दिवस चालू होता. शेवटी आमच्या रोजच्या कटकटींना वैतागून काकांनी त्यावर एक जालीम उपाय शोधला. त्यांनी चक्क एक extra switch बाथरूमच्या आत बसवले. त्याची रचनाच अशी होती कि बाहेरून switch बंद केले तरी आतले switch on असले तर दिवा चालू राहायचा. अखेरीस दिव्याचा नाद सगळ्यांनीच सोडला!!!
आणखी काही गमती-जमती पुढच्या post मध्ये लिहीन.

Chala mala sagalya aatalya goshti kalnar tar(lahan-mothya bhavandanchya)
ReplyDeleteम्हणजे घरातले सगळेच एकाहून एक वरचढ होते तर...
ReplyDelete@ मनीषा: अरेच्या! तुला मी विसरलेच होते! आता काळजीपूर्वक लिहिणार.
ReplyDelete@ आकांक्षा: अजुन तर बरच काही ठाऊक व्हायचय तुला!